क्रिकेटच्या वादातून चाकूहल्ल्यात एक जखमी

On: June 30, 2022 9:49 PM

जळगाव : क्रिकेट खेळण्याच्या जुन्या वादातून चौघांनी एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव सोनार, ओम सोनार, यश सुर्यवंशी व रवी सुर्यवंशी अशा चौघांविरुद्ध जखमी सोमेश अर्जुन महाजन याने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

साधारण दिड महिन्यापुर्वी क्रिकेट खेळण्याच्या वादाचा वचपा काढण्यासाठी वैभव सोनार, ओम सोनार, यश सुर्यवंशी, रवी सुर्यवंशी यांनी सोमेश महाजन यास टाकळी ता. चाळीसगाव येथे 28 जूनच्या रात्री साडे आठच्या सुमारास शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण करत हातपाय तोडण्याची धमकी दिली. दरम्यान यश सुर्यवंशी याने सोमेश यास पकडून ठेवले आणि वैभवने चाकूने त्याच्या खांद्यावर, पोटाच्या डाव्या बाजूस वार करत जखमी केले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक अमित बाविस्कर करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment