पत्नीबद्दल अपशब्द वापरणा-याची हत्या

On: July 14, 2022 10:31 AM

नगर : पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याच्या रागातून दोघांनी एकाची हत्या केल्याची घटना चास (ता. नगर) शिवारातील फलके फार्म हाऊस परिसरात मंगळवारच्या दुपारी घडली. राहुल कनका मोरे (19), रा. बाबुर्डी घुमट, ता. नगर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमंत नरसू गायकवाड (24) आणि सुरज लक्ष्मण मोरे (22), दोघे रा. बाबुर्डी घुमट अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारच्या दुपारी हनुमंत व सुरज या दोघा तरुणांचा मयत राहुलसोबत वाद झाला होता. राहुलने सुरजच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याने हा वाद वाढला होता. या रागातून हनुमंत व सुरज या दोघांनी राहुलचा दोरीने गळा आवळून त्याची हत्या केली. घटनेनंतर राहुलचा मृतदेह तेथेच ठेवण्यात आला होता.

बुधवारी सकाळीच हनुमंतने कोतवाली पोलिस स्टेशनला येवून घटनेची माहिती दिली. अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्यासह नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप व पोलिस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment