सप्तशृंग गडावर सुरक्षा रक्षकाची हत्या

On: July 15, 2022 10:07 AM

नाशिक : सप्तशृंग गड ट्रस्टमध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी करणा-या तरुणाची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. अर्जुन पवार असे हत्या झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. या घटनेने सप्तशृंग गड परिसरात खळबळ माजली आहे. नांदुरी ते गड घाट दरम्यान गणेश घाट धबधब्याच्या पुढे रात्री नऊ वाजेच्या सुमारास मृतदेह भाविकांच्या नजरेस पडला.

भाविकांनी या घटनेची माहिती न्यासाच्या कार्यालयात दिल्यानंतर प्रशासनाने घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवली. रुग्णालयात नेल्यानंतर वैद्यकीय अधिका-यांनी त्यास मृत घोषित केले. मयत अर्जुन पवार हा कळवण तालुक्यातील भेंडी या गआवी सासरवाडीला राहून नोकरीनिमीत्त ये जा करत होता. कळवण पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी भेट देऊन पाहणी केली. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक समाधान नागरे पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment