लेकर आ रही हू एक यादगार गीत – अमृता फडणवीस

On: July 16, 2022 5:55 PM

मुंबई : भाजप नेते तथा राज्याचे विद्यमान उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी बँक मॅनेजमेंट ते गायन अशी वाटचाल केली आहे. अमृता फडणवीस आता एक नवीन गाणे चाहत्यांसाठी घेऊन आल्या आहेत. या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

आपल्या नवीन गाण्याबद्दल ट्विट करत त्यांनी माहिती दिली आहे. ‘लेकर आ रही हूँ एक यादगार गीत पुराना. लफ़्ज़ नए है, पर रंग वही सुहाना’ थँक यू सारेगामा ग्लोबल , कमिंग अप! असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. यापूर्वी अनेक अल्बमसाठी अमृता फडणवीस यांनी गायन केले आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा अल्बम यापूर्वी प्रदर्शित झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment