जरीफ अहमद चिश्तींचा मृतदेह अफगणीस्तानला रवाना

On: July 24, 2022 10:16 AM

नाशिक : गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेल्या अफगाणी निर्वासित जरीफ अहमद सय्यद चिस्ती यांचा मृतदेह मुंबई व तेथून विमानाने अफगणीस्तानला रवाना करण्यात आला आहे.

येवला तालुक्यातील एमआयडीसी प्लॉटवर भूमीपुजनाच्या निमीत्ताने बोलावून जरीफ अहमद चिश्ती यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेत आतापर्यंत सहा संशयीत अटकेत आहेत. मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने सदर हत्या करण्यात आली होती. मयत जरीफ यांचे नातेवाईक अफगाणिस्तानात असल्यामुळे दफनविधी करण्यात अडचण येत होती. पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात ठेवला होता. नातेवाईकांना व्हिसा मिळण्यातील अडचणी दूर झाल्यामुळे त्यांच्यासोबत मृतदेह अफगाणिस्तानात पाठवण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment