बलात्काराच्या गुन्ह्याच्या भितीपोटी तरुणाची आत्महत्या

On: July 28, 2022 10:09 AM

जळगाव : बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवत विस हजार रुपयांची मागणी केल्याने घाबरुन तरुणाने केलेल्या आत्महत्येप्रकरणी सहा जणांविरुद्ध चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहीद मुन्ना शेख (20) रा. केजीएन कॉलनी चोपडा असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याने 22 जुलै रोजी दुपारी विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली होती.

या घटनेप्रकरणी मयत शाहिद याच्या वडीलांनी चोपडा शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत शाहीद याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्या प्रेमसंबंधाचा धागा पकडून संबंधीत महिलेसह एकुण सहा जणांनी शाहीद याच्याकडे विस हजार रुपयांची मागणी केली होती. विस हजार रुपये दिले नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करु अशी त्याला धमकी देण्यात आली होती. त्या भितीपोटी घाबरुन विस वर्षाच्या शाहीदने विषारी पदार्थ प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपवल्याचे म्हटले आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकारणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. संतोष चव्हाण करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment