तरुणीचे अश्लील फोटो अपलोड केल्याच्या आरोपाखाली तरुणास अटक

On: July 29, 2022 8:48 AM

जळगाव : तरुणीचे अश्लिल फोटो सोशल मिडीयावरील बनावट अकाऊंटवर अपलोड केल्याच्या आरोपाखाली जळगावच्या संशयीत तरुणास वर्धा पोलिसांनी अटक केली आहे. मुकेश रोहिदास झाल्टे (रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयीत तरुणाचे नाव आहे.

एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने वर्धा पोलिसांनी त्याला जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातून अटक केली. वर्धा शहर पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. गुरुवारी मुकेश झाल्टे यास अटक करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment