धुळे जिल्हाधिकारी निवासस्थान परिसरातून चंदन वृक्षाची चोरी

On: August 9, 2022 12:34 PM

धुळे : कडेकोट बंदोबस्त असतांना देखील धुळे जिल्हाधिकारी निवासस्थान परिसरातून चंदनाच्या वृक्षाची कत्तल करत चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. असाच प्रकार काही महिन्यांपुर्वी नाशिक येथे डीआयजी निवासस्थान परिसरात घडला होता. त्या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता व गुन्हा उघडकीस देखील आला होता. या घटनेप्रकरणी धुळे शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेपासून काही अंतरावर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे निवासस्थान असून येथे कायम पोलिसांचा बंदोबस्त असतो. तरी देखील चंदन वृक्षाची चोरी झाल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. घटनेची माहिती समजताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी कृष्णा नामदेव धोंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिस स्टेशनला अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment