राज्यातील बड्या अधिका-यांची शासकीय निवासस्थाने चंदन तस्करांची टार्गेट

On: August 12, 2022 10:30 AM

बुलडाणा : राज्यातील बड्या अधिकारी वर्गाच्या निवासस्थान परिसरातील चंदनाची झाडे चोरी करण्याचा सपाटाचा चंदन तस्करांनी लावल्याचे दिसून येत आहे. कडेकोट पहारा असून देखील बड्या अधिकारी वर्गाच्या निवास स्थान परिसरातून चंदनाची झाडे कापून नेत असल्याचे नाशिक, धुळे आणि आता बुलढाणा येथील घटनेतून दिसून आले आहे. चंदन चोरांच्या टोळीने गुरुवारच्या रात्री गृह विभागाचे नायब तहसीलदार पी. के. करे यांच्या शासकीय निवासस्थान परिसरातून चंदनाचे झाड कापून नेल्याचे उघडकीस आले आहे.

काही महिन्यापुर्वी नाशिक डीआयजी निवासस्थान परिसरातून चंदनाच्या झाडाची चोरी झाली होती. त्यानंतर आता काही दिवसांपुर्वी धुळे जिल्हाधिकारी निवासस्थान परिसरातून चंदनाचे झाड कापून नेल्याचे उघडकीस आले. त्यानंतर आता बुलढाणा येथील नायब तहसीलदार यांच्या शासकीय निवासस्थान परिसरातून देखील चंदनाचे झाड कापून नेल्याचे उघडकीस आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment