किराणा दुकान फोडणारा डबल पोलिसांच्या ताब्यात

On: August 16, 2022 6:06 PM

जळगाव : किराणा दुकानाच्या गल्ल्यातील नव्वद हजार रुपयांची रक्कम चोरुन नेणा-या आरोपीस शहर पोलिस स्टेशनच्या दोघा कर्मचा-यांनी अटक केली आहे. जुबेर शेख भिकन उर्फ डबल असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. जळगाव शहर पोलिस स्टेशनचे हे.कॉ. भास्कर ठाकरे आणि पो.कॉ. तेजस मराठे या दोघांनी त्याला गेंदालाल मिल परिसरातून अटक केली आहे. गुन्हा घडल्यानंतर गेल्या दिड महिन्यापासून जुबेर शेख उर्फ डबल हा फरार होता.

जळगाव शहराच्या शिवाजी नगर परिसरातील क्रांती चौकात आनंद आनंद मदनलाल नागला यांचे किराणा दुकान आहे. 1 जुलै 2022 रोजी रात्री 09.45 वा. नेहमीप्रमाणे त्यांनी आपले दुकान बंद करुन वरच्या मजल्यावरील घरात गेले होते. दुस-या दिवशी सकाळी सात वाजता ते दुकानात आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. शटर उचकावून चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 85 हजार रुपये रोख आणि 5 हजार रुपयांची चिल्लर असे एकुण 90 हजार रुपयांची चोरी झाल्याप्रकरणी त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. या गुन्ह्याच्या तपासात हे.कॉ. भास्कर ठाकरे व पो.कॉ. तेजस मराठे आदींनी त्याला शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment