वेश्या व्यवसाय प्रकरणी हॉटेल हेरंब पॅलेस वरील कारवाईत दोघांविरुद्ध गुन्हा

जळगाव : वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या हॉटेलवर सहायक पोलिस अधिक्षक डॉ. कुमार चिंता यांच्या पथकाने काल दोन हॉटेलवर छापा कारवाई केली. जळगाव भुसावळ महामार्गावरील हॉटेल हेरंब पॅलेस या हॉटेलवरील कारवाई प्रकरणी दोघा जबाबदार संबंधीत व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव भुसावळ महामार्गावर असलेल्या हॉटेल हेरंब पॅलेस या हॉटेलवरील कारवाईत दोघांविरुद्ध स्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 चे कलम 3 नुसार कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 3200 रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पो.नि. विजय शिंदे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here