विशेष पोलिस महानिरीक्षक पथकाच्या धाडीत 35 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

On: August 19, 2022 3:23 PM

नवापूर : गुजरात राज्याच्या सीमेवरील नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा शिवारात एमआयडीसी परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने गुरुवारी भल्या पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास नंदुरबार पोलिसांच्या मदतीने छापा टाकला.

या छापा कारवाईत 54 जुगारींना ताब्यात घेण्यात आले. यातील 46 जण गुजरात राज्यातील तर 18 महाराष्ट्रातील आहेत. जुगा-यांमधे महिलांचा देखील समावेश आहे. या कारवाईत 35 लाख 61 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यात 7 लाख 53 हजार 40 रुपये रोख रक्कम आहे. नवापूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि.बापू रोहम, स.पो.नि. सचिन जाधव, सहायक फौजदार बशिर तडवी, पोहेकॉ. रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, पोलिस नाईक मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मडलीक, सुरेश टोगारे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment