टोल कर्मचाऱ्यांची पोलिस अधिक्षकांसोबत हुज्जत

On: August 20, 2022 9:12 AM

नाशिक : जळगाव नजीक नशिराबाद टोल नाका सर्वत्र चर्चेत आला असतांना आता नाशिक नजीकचा पिंपळगाव टोल नाका देखील चर्चेत आला आहे. येथील टोल कर्मचा-याने थेट नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासोबत हुज्जत घातल्याचे समोर आले असून या घटनेप्रकरणी पिंपळगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव येथून शासकीय कामकाज आटोपून नाशिकला जात असतांना पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांचे वाहन पिंपळगाव टोल नाक्यावर आले. यावेळी  स्वतंत्रलेन बंद असल्याने वाहन दुसऱ्या लेनला नेण्यात आले. 15 ते 20 मिनिटांचा कालावधी होऊन देखील लेन ओपन होत नसल्याने पोलीस अधीक्षकांनी याबाबत विचारणा केली. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी गाडी जाऊ दिली नसल्याचे म्हटले जाते. कर्मचाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांसोबत हुज्जत घालत अरेरावी केल्यामुळे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधत संबंधित कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. पिंपळगाव पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment