दरोड्याच्या तयारीतील पाच जणांना भुसावळला अटक

On: August 20, 2022 11:36 AM

जळगाव : दरोड्याच्या तयारीत असतांना घातक हत्यारासह पाच जणांना भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या कब्जातून चाकू, कु-हाड, दोर व मिरची पावडर असे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. सुरज अशोकराव भांगे रा. पापा नगर इराणी वाडा भुसावळ, कलीम शेख सलीम शेख रा. दिनदयाल नगर भुसावळ, समीर शहा उर्फ डमरु जब्बार शहा रा. दिनदयाल नगर भुसावळ, गिरिष गोकुलसिंग जोहरी रा. दिनदयाल नगर भुसावळ आणि विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण रा. सोनिच्छा वाडी भुसावळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

19 ऑगस्टच्या रात्री 12.05 वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील वांजोळा रस्त्यावरील प्रेरणा नगरच्या दिशेने जाणा-या रस्त्यावर गस्तीवरील पोलिसांना हत्यारासह आरोपी मिळून आले. त्यांना हटकले असता उलट त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की सुरु केली. दरोड्याची पुर्व तयारी करणे, सरकारी कामात अडथळा आणणे आदी कलमाखाली अटकेतील सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि. सुदर्शन वाघमारे पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment