आदित्य ठाकरे यांच्या रॅलीत तरुणाच्या 70 हजार रुपयांची चोरी

On: August 22, 2022 11:47 AM

जळगाव : शिवसेनेचे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या रॅलीत सहभाग घेणा-या तरुणाच्या ताब्यातील रोकड आणि चार मोबाईल चोरुन नेल्याप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदू रमण मिस्तरी रा. स्व. राजीव गांधी नगर पारोळा या तरुणाने या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

20 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नंदू मिस्तरी याने आदित्य ठाकरे यांच्या रॅलीत सहभाग घेतला होता. धरणगाव नाका परिसरात गर्दीचा गैरफायदा घेत नंदू याच्या ताब्यातील 69 हजार 500 रुपये रोख आणि 22 हजार 500 रुपये किमतीचे चार मोबाईल असा एकुण 92 हजाराचा मुद्देमाल चोरी झाला. या घटनेप्रकरणी रोहीदास अशोक लोंढे रा. मालेगाव या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment