मोबाईलच्या वादातून खूनप्रकरणी आरोपीस अटक

On: August 22, 2022 10:08 PM

जळगाव : मोबाईल खराब केल्याच्या वादातून झालेल्या खूनाच्या घटनेतील फरार आरोपीस एमआयडीसी व जिल्हा पेठ पोलिसांच्या संयुक्त गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. निलेश प्रविण पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रविवारी 21 ऑगस्ट रोजी खूनाची घटना घडल्यापासून निलेश पवार हा फरार होता.

निलेश प्रवीण पवार रा. रिंग रोड जळगाव हा शिरसोली येथे लपून बसला असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राठोड यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, जितेंद्र राठोड, समाधान टहाकळे, शुद्धोधन ढवळे, इमरान सय्यद, किशोर पाटील, राकेश बच्छाव, मुदस्सर काझी, सुधीर साळवे, सचिन पाटील तसेच जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, सलीम तडवी, रवींद्र साबळे, जुबेर तडवी, अमित मराठे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. या पथकाने शिरसोली येथील जंगलात लपून बसलेल्या निलेश पवार यास शिताफीने ताब्यात घेत अटक केली. पुढील तपासकामी अटकेतील निलेश पवार यास जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment