नाशिक पुणे महामार्गावर अठरा तासांसाठी वाहनधारक झाले टोलफ्री

On: August 26, 2022 11:54 AM

नाशिक : विविध मागण्यांसाठी टोल नाक्यावरील कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन केल्यामुळे नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाक्यावरुन जाणा-या वाहन धारकांना तब्बल अठरा तास टोलमधून पुर्णपणे सुट मिळाली.

टोल नाक्यावरील व्यवस्थापन अधिका-यांकडून कर्मचा-यांना अरेरावी होत असल्याच्या आरोपासह नोकरीत कायम करण्याचे पत्र मिळावे, विमा पॉलीसी काढून मिळावी, शासकीय सुट्ट्यांचे वेतन दुप्पट मिळावे, दरवर्षी 15 टक्के पगारवाढ मिळावी, निलंबीत केलेल्या कर्मचा-यांना पुन्हा कामावर घ्यावे अशा विविध मागण्यांसाठी तेथील कर्मचा-यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले. या आंदोलनामुळे बुधवारी रात्री बारा ते गुरुवारी सायंकाळी सहा दरम्यान वाहनधारकांना टोल फ्री झाला होता. या कालावधीत जवळपास आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment