नऊ वर्षाच्या बालकाला शिक्षीकेने केली अमानुष मारहाण – जळगाव शहरातील प्रकार

On: September 2, 2022 11:33 AM

जळगाव : जळगाव शहरात एका खासगी क्लास संचालकांनी नियुक्त केलेल्या महिला शिक्षिकेने नऊ वर्षाच्या बालक विद्यार्थ्यास अमानुषपणे त्याचे कपडे काढून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान या घटनेचे वृत्त समोर येताच समाजात सर्वत्र खळबळ माजली असून या निंदनीय घटनेबद्दल तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेचे सविस्तर वृत्त असे की शनीपेठ परिसरातील गुरुनानक नगर भागात राहणारे योगेश गणेश ढंढोरे यांचा नऊ वर्षाचा मुलगा खुशाल हा बळीराम पेठेतील कोठारी क्लासेस येथे शिकण्यासाठी जातो. शहा दाम्पत्य संचलीत या क्लासमधे पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाते. या क्लासमधील पल्लवी नामक नियुक्त शिक्षीकेने खुशाल या नऊ वर्षाच्या बालकाचे कपडे काढून त्याला चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे पालकांच्या निदर्शनास आले.

आपल्याला नेहमी मारहाण होत असल्याची तक्रार खुशाल याने पालक योगेश ढंढोर यांच्याकडे केली होती. या तक्रारीत कितपत तथ्य आहे हे बघण्यासाठी त्यांनी अचानक या क्लासमधे प्रवेश केला असता खरा प्रकार उघड झाला. पालक समोर येताच या शिक्षिकेने विद्यार्थी बालकास त्याचे कपडे परत देत सावरासावर करण्यास सुरुवात केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पालक योगेश ढंढोरे हे जळगाव शहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यास आले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment