धुळ्याच्या इसमाला अमित शहांच्या दौ-यात अटक

On: September 8, 2022 10:13 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात संशयास्पदरित्या वावरणा-या तरुणाला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे. हेमंत पवार असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो मुळचा धुळे येथील रहिवासी असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

अमित शाह यांचा मुंबई दौरा असतांना सुरक्षा यंत्रणा भेदत तो वावरत होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थासह अमित शाह आणि इतर राजकीय नेत्यांच्या अवतीभोवती वावरत असतांना मंत्रालयातील एका अधिका-याला त्याचा संशय आला. त्या अधिका-याने ही बाब पोलिस अधिका-यांना सांगितली. ओळख पटत नसल्यामुळे त्याला ताब्यात घेतले असता आपण आंध्र प्रदेशच्या खासदाराचे पीए असल्याचे त्याने सांगितले.

मंत्र्यांची भेट घेत त्यांच्यासोबत फोटो काढण्याची त्याची इच्छा असल्याचे दिसून आले आहे. या फोटोचा तो त्याच्या फायद्यासाठी वापर करणार होता असा संशय आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता 12 सप्टेबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. खासदारांच्या पीएसाठी लागणारा पास देखील त्याच्याकडे उपलब्ध होता. अधिक तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment