परिचारिकेवर अत्याचाराच्या आरोपाखाली डॉक्टरला अटक

On: September 12, 2022 9:28 AM

नाशिक : नाशिकच्या सिडको परिसरात खासगी दवाखाना चालवणा-या डॉक्टरने आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप दवाखान्यातील प्रशिक्षणार्थी परिचारिकेने केला आहे. परिचारिकेने पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार डॉक्टरविरुद्ध बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. डॉ. उल्हास कुटे असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे.

प्रशिक्षणार्थी परिचारिका काम करत असलेल्या दवाखान्यातील डॉक्टरने शनिवार 10 सप्टेबर रोजी अत्याचार केल्याचा आरोप असून रविवार 11 सप्टेबर रोजी उघडकीस आल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी आरोप करण्यात आलेल्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयाच्या खोलीत प्रशिक्षणार्थी परिचारिका रहात होती. ती एकटी असल्याचे बघून संशयीत डॉक्टरने हातपाय दुखत असल्याचे निमित्त करून तिच्या खोलीत प्रवेश करत तिच्यासोबत अंगलट केल्याचा आरोप आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगिरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment