महापौरांच्या निवासस्थानासमोर दगडफेक प्रकरणी आठ अटकेत

On: September 12, 2022 7:39 PM

जळगाव : जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या निवासस्थानासमोर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेक प्रकरणी आणखी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यापुर्वी तिन जणांना अटक करण्यात आली आहे.

योगेश राजेंद्र नाईक, तेजस ज्ञानेश्वर वाघ, अजय संतोष सांगळे, किरण उर्फ उली जगदीश नाईक, तेजस उर्फ लगड्या सुनिल घुगे, दिपक रविंद्र नाईक, रामेश्वर वासुदेव सानप सर्व रा. साईबाबा मंदीराजवळ मेहरुण जळगाव तसेच महेश उर्फ माही लक्ष्मण लाड रा. कुंभारवाडा मेहरुण अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.

मंगेश राजेंद्र नाईक, भरत चांगदेव आंधळे आणि सागर विजय लाड या तिघांना यापुर्वीच अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे यांच्यासह दत्तात्रय बडगुजर व सचिन मुंडे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment