गावठी पिस्टलसह आरोपीस अटक

On: September 13, 2022 7:14 PM

जळगाव : गावठी पिस्टल बाळगणा-या तरुणास त्याच्या ताब्यातील पिस्टल व मोटार सायकलसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. गोलुसिंग दिलीपसिंग भाटीया रा. शिंगनुर पो. बेहरामपुरा जि. खरगोन असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

गोलुसिंग भाटीया हा तरुण बेकायदा गावठी पिस्टलसह यावल येथून चोपडा शहराच्या दिशेने जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकाला घटनास्थळावर रवाना केले होते. मोटार सायकल तपासणी दरम्यान संशयीत गोलुसिंग हा 12 सप्टेबर रोजी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास पिस्टलसह पोलिस पथकाच्या हाती लागला. त्याच्या ताब्यातील तिस हजार रुपये किमतीचे पिस्टल आणि मोटार सायकल असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. भारतीय हत्यार कायद्यानुसार यावल पोलिस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोहेकॉ सुनिल दामोदरे, पोहेकॉ दिपक शांताराम पाटील, पोना नंदलाल दशरथ पाटील, पोना किरण धनगर, पोना प्रमोद लाडवंजारी, पोना भगवान तुकाराम पाटील, चापोहेकॉ भारत पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. आरोपीस यावल पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment