घातक शस्त्र बाळगणा-या तरुणास अटक

On: October 5, 2022 8:49 PM

जळगाव : जिवंत काडतुसासह गावठी पिस्टल तसेच एक कुकरी अशा घातक शस्त्रासह तरुणाला जळगाव शहर पोलिसांच्या पथकाने आज अटक केली आहे. निखील सुरेश पाटील रा. खोटे नगर (सुरक्षानगर), जळगांव असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

जळगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आणि मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने निखील यास नवीपेठ परिसरातून अटक करण्यात आली. पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय ज्ञानदेव पोटे, पो.हे.कॉ. भास्कर यशवंत ठाकरे, पो.ना. प्रफुल्ल दिपक धांडे, पो.कॉ. अमोल ठाकुर, पो. कॉ. रतन हरी गिते, पो. कॉ. ज्ञानेश्वर उन्हाळे आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

निखील पाटील याने गुन्हयात वापरलेली मोटारसायकल देखील तपासकामी हस्तगत करण्यात आली आहे. त्याच्याविरुध्द जळगांव शहर पो.स्टे. ला गु.र.नं. 318 / 2022 भारतीय शस्त्रअधिनियम कलम 3 / 25, 4/25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ. भास्कर यशवंत ठाकरे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment