क्राईम रिपोर्टर, एसीबी अधिकारी असल्याचे भासवून महिलेकडून 45 हजारांची खंडणी

On: October 16, 2022 2:32 PM

जळगाव : आम्ही सर्व तुमच्या पतीच्या ओळखीचे आहोत असे सांगून महिलेस बळजबरी एक हजार रुपये दिले. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ केल्याचे सांगून आता आम्ही क्राईम रिपोर्टर आणि एसीबीचे अधिकारी, कर्मचारी असल्याचे सांगून हजार रुपये दिल्याचा  व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून 45 हजार रुपयांची खंडणी वसूल केल्याच्या आरोपाखाली  चौकडी विरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेंद्र सोनवणे रा. खर्दे ता. धरणगांव, राजेंद्र निकम रा. वाघ नगर जळगांव (कथित क्राईम इन्व्हेस्टीगेशन न्यूज रिपोर्टर) व त्याच्या सोबतचे इतर तीन अनोळखी इसम अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शाळेच्या आवारात 10 ते 15 ऑक्टोबर दरम्यान ही मंडळी या तक्रारदार महिलेस भेटली. आम्ही तुमच्या पतीचे परिचित आहोत असे सांगून त्यांनी तिच्याजवळ बळजबरी एक हजार रुपये दिले. या घटनेचा व्हिडीओ केला असल्याचे तसेच क्राईम रिपोर्टर असल्याचे राजेंद्र निकम याने तिला सांगितले. आम्ही एसीबीचे अधिकारी, कर्मचारी आहोत असे इतरांनी तिला सांगत धमकावले. तिच्यासोबत अंगलगट करत 45 हजार रुपये खंडणी रुपात उकळले. तिच्यासोबत शरीर सुखाची मागणी करत तिचा विनयभंग करत पुन्हा खंडणी मागितल्याचा आरोप महिलेने केला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिसात दाखल गुन्ह्याचा तपास पोलिस उप निरिक्षक प्रदीप चांदेलकर करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment