भाजीपाला विकण्यास जाते असे सांगून गेलेली विवाहिता बेपत्ता

On: October 29, 2022 9:52 AM

जळगाव : भाजीपाला विकण्यासाठी जाते असे सांगत घरातून गेलेली विवाहिता बेपत्ता झाल्याप्रकरणी यावल पोलिस स्टेशनला मिसींग दाखल करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील साकळी येथील 28 वर्षाची विवाहिता तिच्या पतीच्या घरुन भाजीपाला विकण्यासाठी जात असल्याचे सांगून 20 ऑक्टोबर रोजी गेली होती. नंतर ती घरी आलीच नाही. तिच्या पतीसह नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता ती कुठेही मिळून आली नाही. रावेर येथील तिच्या आईने यावल पोलिस स्टेशनला दिलेल्या खबरीनुसार मिसींग दाखल करण्यात आली आहे.

रंगाने सावळी, अंगाने सडपातळ, उंची पाच फुट तसेच अंगात पिवळ्या रंगाची जांभळ्या काठपदराची साडी, पिवळ्या रंगाचे ब्लाऊज, पायात स्लिपर परिधान केलेल्या बेपत्ता विवाहितेचा तपास हे.कॉ. सिकंदर तडवी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment