भुसावळ रेल्वे यार्डात तरुणाची हत्या उघडकीस

On: October 29, 2022 4:50 PM

जळगाव : भुसावळ – खंडवा लोहमार्गावरील रेल्वे यार्डात तरुणाची गळा चिरुन हत्या झाल्याची घटना उघडकीस आली असून परिसरात खळबळ माजली आहे. हत्या झालेला तरुण अमृतसर येथील असून मनमीतसिंग गुरुप्रितसिंग असे त्याचे नाव असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. या घटने प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिस स्टेशनला चौघा संशयितांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत मनमीतसिंग हा आपल्या काही मित्रांसह बुधवार दि. 26 ऑक्टोबर रोजी नांदेड-अमृतसर एक्स्प्रेसने अमृतसरच्या दिशेने प्रवास करत होता. प्रवासादरम्यान डी-2 या डब्यात त्याचा काही प्रवाशासोबत वाद व हाणामारी देखील झाल्याचे समजते.

दरम्यान मनमीतसिंग व पाच तरुण खंडवा मार्गावरील रेल्वे यार्डात उतरले. त्यानंतर गुरुवार 27 ऑक्टोबर रोजी सकाळी मनमीतसिंगचा गळा चिरलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. त्याच्या सोबत असलेल्या तरुणांनीच त्याची हत्या केल्याचा संशय त्याच्या भावाने पोलिसांजवळ व्यक्त केला. सुरुवातीला या घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. मयत मनमितसिंग याच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध हत्येचा गुन्हा भुसावळ लोहमार्ग पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोहमार्ग पोलिस निरीक्षक विजय घेरडे व त्यांचे सहकारी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment