खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयित महीलेस अटक

On: November 1, 2022 5:54 PM

जळगाव : फटाके फोडण्याच्या वादातून झालेल्या खूनाच्या घटनेतील फरार संशयित महिलेस एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. सतकौरसिंग बावरी असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. संजयसिंग टाक या तरुणाच्या हत्येप्रकरणी 26 ऑक्टोबर रोजी पहाटे एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली आहे. 

गुन्हा घडल्या पासुन फरार संशयित महीला आरोपी सतकौर जगदीशसिंग बावरी ही मनमाड येथे लपून असल्याच्या माहितीवरुन गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पोना विकास सातदिवे व महीला पोकॉ सपना ऐरगुंटला आदींच्या पथकाने मनमाड गाठत स्थानिक पोलिसांच्या मदतीने महिला आरोपीस अटक केली आहे. मनमाड शहरातील मोठे गुरुव्दारा भागात ती लपली होती. पोलिस पथक आपल्या मागावर असल्याची चाहूल लागताच तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने पाठलाग करत तिला ताब्यात घेत अटक केली. 

अटकेतील मोहनसिंग बावरी, मोनुसिंग जगदीश बावरी, जगदीश हरीसिंग बावरी व सतकौर जगदीशसिंग बावरी या सर्वांना न्यायालयात हजर केले असता 5 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पोना विकास सातदिवे, म पोकाँ सपना ऐरगुंटला तसेच मनमाड शहर पोस्टेचे पोकॉ सागर महाले आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment