सामान्य रुग्णालयात महिलेचा विनयभंग

On: November 8, 2022 6:40 PM

जळगाव : सामान्य रुग्णालयात कुसुंबा येथील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणासह त्याच्या दोघा साथीदारांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय उर्फ बबल्या दिलीप पाटील रा.कुसुंबा तुळजाईनगर असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. “तु माझ्यासोबत चल आणि माझ्यासोबत संबंध ठेव नाही तर मी तुला उचलून घेवून जाईन अशी विजयने आपल्याला धमकी दिल्याचा आरोप महिलेने केला आहे.

सामान्य रुग्णालयातील वार्ड क्रमांक 9 कडे जाणा-या जिन्यावर विजय पाटील याने महिलेचा उजवा हात ओढून विनयभंग केला तसेच त्याच्या दोघा साथीदारांनी तिला शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी जिल्हापेठला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलिस नाईक शिंदे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment