जळगाव : विवाहितेची छेड का काढली असा जाब विचारत संबंधीत महिलेच्या पतीसह इतरांनी तरुणास जबर मारहण केल्याची घटना सावरला ता. जामनेर येथे घडली. 6 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी दवाखान्यात दाखल असलेल्या जखमीने पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार जामनेर पोलिस स्टेशनला दंग्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीराम गोविंदा पाटील असे जखमीचे नाव आहे. अरुण सुरवाडे, भास्कर सुरवाडे, रोशन सुरवाडे, गौतम झणके, अरुण याचा शालक व एक महिला अशा सर्वांविरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आला असून हे.कॉ. सचिन पाटील पुढील तपास करत आहेत.