सीसीटीव्ही कॅमेरा चोरटा अटकेत

On: November 12, 2022 11:06 PM

जळगाव : घराबाहेर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा चोरुन नेणा-या चोरट्यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. तैय्यब अरमान पटेल (29) रा. खुबा मशीद जवळ, खुबा नगर सुप्रीम कॉलनी, जळगाव असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातुन पंधराशे रुपये किमतीचा सीपी प्लस कंपनीचा सीसीटीव्ही कॅमेरा हस्तगत करण्यात आला आहे.

अजिमोद्दिन आरीफ पटेल हे औषध विक्रेता कोहीनुर चौक सुप्रिम कॉलनी परिसरात राहतात. 9 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री पावणेचार वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा अज्ञात चोरट्याने चौरुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासात स.पो.नि.अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. किशोर पाटील, इमरान सय्यद, सचिन पाटील आदींनी तैय्यब पटेल यास अटक केली. त्याच्या ताब्यातून सीसीटीव्ही कॅमेरा हस्तगत करण्यात आला आहे. न्या. श्रीमती जे.एस. केळकर यांच्या न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment