दोघा अल्पवयीन मुलींना दोघांनी नेले पळवून

On: November 13, 2022 11:53 AM

जळगाव : परभणी जिल्ह्यातून चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे चुलत भावाकडे आलेल्या दोघा अल्पवयीन बहिणींना परभणी जिल्ह्यातील दोघांनी पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला संतोष कैलास सोनवणे व समीर शेख या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यातील सेलू येथील दोघी अल्पवयीन बहिणी चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे त्यांच्या चुलत भावाकडे आल्या होत्या. दरम्यान दोघी बहिणी चाळीसगाव तालुक्यात आल्याचे लक्ष ठेवून सेलू येथूनच दोघे जण त्यांच्या मागावर आले होते. त्यांनीच दोघा अल्पवयीन बहिणींना पळवून नेल्याचा गुन्हा चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला असून हे.कॉ. श्रीराम सोनवणे पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment