अकरा लाखांच्या दागिन्यांची चाळीसगावला चोरी

On: November 14, 2022 8:37 AM

जळगाव : अकरा लाख रुपये किमतीच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी चाळीसगाव शहरात उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय भिला मालपुरे हे शिक्षक चाळीसगाव शहरातील शास्त्री नगर योगेश कॉलनी परिसरात राहतात. 11 व 12 नोव्हेंबर 2022 या कालावधीत त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाची कडी कोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या घटनेत मालपुरे यांच्या घरात बेडरुम मधील कपाटात ठेवलेले 11 लाख 69 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेल्याचे उघडकीस आले.

13 नोव्हेंबर रोजी दत्तात्रय मालपुरे घरी आल्यानंतर हा सर्व प्रकार लक्षात आला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक आव्हाड करत आहेत. दरम्यान या घटनेने चाळीसगाव शहरात खळबळ उडाली आहे. चाळीसगाव शहर परिसरात रात्र गस्तीवर मोठ्या प्रमाणावर भर दिला जावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment