अल्पवयीन मुलीसोबत बाथरुममधील फोटो व्हायरल – पारोळा पोलिसात गुन्हा

On: November 14, 2022 11:04 AM
imaginary image according to crime story

जळगाव : अल्पवयीन मुलीसोबत बाथरुममधे आक्षेपार्ह अवस्थेत काढलेला फोटो व्हायरल करणा-या तरुणाविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

पारोळा तालुक्याच्या एका गावातील पिडीत अल्पवयीन मुलीची आई परगावी गेली होती. दरम्यानच्या कालावधीत तिला सुभाष हटकर या तरुणाने तिला रात्री बाथरुममधे बोलावून तिच्यासोबत विक्षीप्त अवस्थेत सेल्फी घेतला. तुला माझ्यासोबत रिलेशन ठेवावे लागेल, निर्णय दोन दिवसात कळव नाहीतर हे फोटो व्हायरल करेन, तुझे माझे अफेअर आहे असे लोकांना सांगेन अशी धमकी त्याने मुलीला दिली.

पिडितेकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने सुभाष हटकर याने तो फोटो व्हाटसअ‍ॅप स्टेटसला ठेवत मजकुरासह प्रसिद्ध केला. याप्रकरणी पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पारोळा पोलिस स्टेशनला अ‍ॅट्रॉसीटी, आयटी, पोस्को, विनयभंग आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उप विभागीय अधिकारी ऋषीकेश रावले पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment