प्रेयसीवर बलात्कार – मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन तरुणाने मारली उडी

On: November 17, 2022 5:07 PM

प्रेयसीवर बलात्कार झाला मात्र न्याय मिळाला नाही. आपल्याला न्याय मिळावा म्हणून तरुणाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना हा प्रकार घडला.

सुदैवाने त्याठिकाणी लावण्यात आलेल्या सरंक्षक जाळीमध्ये तो अडकला आणि त्याचा जीव वाचला. यापुर्वी देखील मंत्रालयात आत्महत्येचे अनेकवेळा प्रयत्न झाले आहेत. आतमत्येचा प्रयत्न करणा-यांचा जीव वाचण्यासाठी ही सरंक्षक जाळी मंत्रालयात लावण्यात आली आहे. या जाळीत अडकून तरुणचा जीव वाचला.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हा तरुण असून बापू नारायण मोकाशी असे त्याचे नाव आहे. दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. प्रेयसीवर बलात्कार झाला असून न्याय मिळत नसल्यामुळे आपण हे कृत्य केल्याचे त्याने म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment