एमपीडीए कायद्यान्वये राहुल ब-हाटे नाशिक कारागृहात स्थानबद्ध

On: November 17, 2022 7:40 PM

जळगाव : एमपीडीए कायद्याखाली जळगाव शहराच्या रामेश्वर कॉलनीतील रहिवासी राहुल रामचंद्र ब-हाटे यास एक वर्षासाठी मध्यवर्ती नाशिक कारगृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. राहुल ब-हाटे याच्याविरुद्ध जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला आठ आणि जिल्हापेठ पोलिस स्टेशनला एक असे एकुण नऊ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न करणे, मोठी दुखापत करणे, गैर कायद्याची मंडळी जमवून दंगल घडवणे, गृह अतिक्रमण, सरकारी नोकरावर हल्ला, जिवेठार मारण्याची धमकी देणे, खंडणी उकळणे अशा स्वरुपाचे सर्व गुन्हे आहेत.

या सर्व गुन्हयांमध्ये त्याला वेळोवेळी अटक करण्यात आली होती. न्यायालयातून जामीनावर सुटल्यानंतर देखील तो भारतीय दंड विधान, व मुंबई पोलीस कायदा अंतर्गत गुन्हे करतच होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता तो स्वत: आणि त्याच्यासोबत असणाऱ्या गुंडा सोबत घातक शस्त्रे बाळगत असे. या घातक शस्त्रांच्या बळावर तो लोकांवर दहशत व भिती निर्माण करण्याचे काम करत होता. कायदयाचा त्याला अजिबात धाक नसल्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बाधा निर्माण होवून लोकांच्या मनात असुरक्षीततेची भावना निर्माण झाली होती. दिवसेदिवस वेगवेगळ्या पध्दतीने गुन्हे करण्याची त्याची प्रवृत्ती वाढतच होती. सर्व सामान्य लोकांच्या जिवीतास त्याचे उपद्रवमुल्य वाढत होते.

या सर्व बाबी लक्षात घेता त्याच्याविरुध्द महाराष्ट्र झोपडपटटी दादा, हात भट्टीवाले, औषधी विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हीडीओ पायरेट) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबत अधिनियम सन 1981 नुसार तो ‘धोकादायक व्यक्ती’ या संज्ञेत मोडत असल्यामुळे व त्याची दहशत असल्यामुळे त्याच्या विरुद्ध एमपीडीए कायद्याअंतर्गत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी त्याला स्थानबद्ध करण्याकामी पोलिस निरिक्षक प्रताप शिकारे यांनी पोलीस अधिक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाची पडताळणी करुन पोलीस अधिक्षकांनी जिल्हादंडाधिका-यांकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठवला होता.

त्या अनुशंगाने आज रोजी जळगांव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या आदेशाने राहुल रामचंद्र ब-हाटे यास एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधिक्षक गावीत यांच्या मार्गएदर्शनाखाली आज रोजी त्यास स्थानबद्ध करण्याकामी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रताप शिकारे याच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ विनोद बोरसे, पोलिस नाईक योगेश बारी, पोना सचिन पाटील, पोना गणेश शिरसाळे, पोकॉ विशाल कोळी, सिद्धेश्वर डापकर, पो.कॉ. किरण पाटील तसेच एलसीबीचे सहायक फौजदार युनुस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल दामोदरे, पोहेकॉ जयंत चौधरी आदींनी आज 17 नोव्हेंबर रोजी राहुल ब-हाटे यास ताब्यात घेतले होते. त्याला स्थानबद्ध करण्याकामी पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, पोहेकॉ. रामकृष्ण पाटील, पो.कॉ. मुकेश पाटील आदींचे पथक नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्याकामी रवाना झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment