महिलेवरील चाकू हल्ल्याप्रकरणी भुसावळला गुन्हा दाखल

On: November 18, 2022 11:42 AM

जळगाव : महिलेवरील चाकूहल्ला प्रकरणी भुसावळच्या दिनदयाल नगर भागातील तिघांविरुद्ध बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत व जखमी महिलेने तिघांविरुद्ध भा.द.वि.307 सह विविध कलमानुसार फिर्याद दाखल केली आहे. 16 नोव्हेंबर रोजी पिडीत महिला तिच्या सासूकडे दिनदयाल नगर भागात गेली होती. सदर महिला ओट्यावर गप्पागोष्टी करत बसली असतांना परिसरात राहणारे तस्लीम शेख उर्फ काल्या सलीम शेख, कलीम शेख सलीम शेख आणि गिरीष गोकुलसिंग जोहरी असे तिघे तिच्याजवळ आले.

यातील तस्लिम शेख याने तिला “इधर क्या कर रही है, कोई लडकी है क्या?” अशी विचारणा केली. त्यावर महिलेने आपल्याला काही माहिती नाही असे उत्तर दिले. त्यावेळी तस्लिम याने कमरेला लावलेला चाकू महिलेच्या गळ्यावर लावला. त्याचवेळी कलीम शेख आणि गिरीष जोहरी या दोघांनी तिला शिवीगाळ करत आज इसका काम तमाम कर डालते है असे म्हणत धमकी देण्यास सुरुवात केली.

आपल्या सुनेवर होत असलेला हल्ला आणि शिवीगाळ बघून तिच्या सासूने धाव घेतली. गिरीष जोहरी याने महिलेला पकडून ठेवत कलीम शेख याने तिला लाथ मारली. तस्लीम शेख याने हातातील चाकूने तिच्यावर वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हरिष भोये करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment