धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा

On: November 21, 2022 10:31 AM

जळगाव : एका विशीष्ट समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य असलेल्या रेकॉर्डींगप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रेकॉर्डींगमुळे एका समाजाच्या भावना दुखावल्याचे म्हटले जात आहे.

आसोदा येथील कथित सामाजिक कार्यकर्त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजु बिस्मिल्ला पटेल आणि राजु बिस्मिल्ला पटेल दोन्ही रा. जळगाव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संजु पटेल यास अटक करण्यात आली आहे.

गु.र.न.354/22 भा.द.वि. कलम 295 अ, 506 तसेच अनु. जाती जमाती अत्याचार प्रतिबंध्क कायदा कलम 3 (1) (एस) (आर) (यु) (व्हि) नुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस अधिक्षक संदीप गावीत करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment