झोक्याचा पिळ गळ्यात बसल्याने बालकाचा मृत्यु

On: November 21, 2022 11:47 AM

जळगाव : झोक्यात बसून अभ्यास करणा-या चौदा वर्षाच्या बालकाच्या गळ्याला पिळ बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना अमळनेर येथे 20 नोव्हेंबरच्या रात्री आठ वाजता घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वेदांत संदीप पाटील असे मुंदडा नगर भागातील मयत चौदा वर्षाच्या बालकाचे नाव आहे. वेदांत हा वरच्या मजल्यावर झोक्यात बसून अभ्यास करण्यासाठी गेला होता. झोक्यात बसला असतांना तो झोक्याला पिळ देवून गोल गोल फिरवत होता. दरम्यान अचानक त्याचा तोल जावून तो झोक्यातून सटकला. त्याच्या गळ्याला झोक्याचा पिळ बसला, त्यात त्याचा मृत्यू ओढवला.

वेदांत यास नजीकच्या पद्मश्री हॉस्पीटलमधे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीअंती तो मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे. पोलिस उप निरीक्षक गंभीर शिंदे पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment