अतिप्रसंगास नकार देणाऱ्या महिलेस पेटवून जीवे ठार करण्याचा प्रयत्न

On: November 25, 2022 3:35 PM

जळगाव : महिलेचा हात धरुन तिचा विनयभंग व त्यानंतर तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न अज्ञात इसमाकडून झाल्याचा प्रकार भडगाव शहरात उघडकीस आला आहे. हा प्रकार एवढ्यावरच न थांबता झालेल्या झटापटीत महिला खाली पडून जखमी झाली.

23 नोव्हेंबर रोजी भडगाव शहरातील ओमशांती केंद्राच्या मागे कोठली रोड परिसरात हा खळबळजनक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. मद्य प्राशन केल्याचा संशय असलेल्या अज्ञात इसम झटापटीत खाली पडून जखमी झालेल्या महिलेवर जळती काडी टाकून तिला जाळून ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment