जळगाव शहरात दिवसाढवळ्या घरफोडी

On: December 3, 2022 9:51 AM

जळगाव : बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेचा एकुण 2 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरातील शिवसागर अपार्टमेंटमधील तन्मय पिले यांच्या बंद फ्लॅटमधे हा घरफोडीचा प्रकार घडला आहे. घराला असलेले कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या सकाळी पाच ते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान हा गुन्हा केला आहे. या घटनेत 70 हजार रुपये रोख आणि 1 लाख 39 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने असा ऐवज चोरी झाला आहे.

या घटनेप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 629/22 भा.द.वि. 454, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक गणेश देशमुख करत आहेत. सध्या चो-या व घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून नागरिकांनी देखील आपआपल्या परिने दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment