मोहाडी येथे 3 लाख 88 हजाराची घरफोडी

On: December 4, 2022 9:21 PM

जळगाव : बांधकाम व्यावसायीकाच्या मोहाडी येथील कुलुपबंद घरात सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रकमेचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. 50 हजार रुपये रोख तसेच सोन्या चांदीचे दागिने असा एकुण 3 लाख 88 हजार रुपयांच्या मुद्देमालाच्या चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोतीलाल उर्फ मुकेश श्रावण सोनवणे हे बांधकाम व्यावसायीक मोहाडी येथील मुळ रहिवासी आहेत. मुलांच्या शिक्षणाच्या निमीत्ताने ते जळगावला राहतात. अधूनमधून ते आपल्या मुळ गावी मोहाडी येथे जात असतात. मोहाडी येथील त्यांच्या घराचा दरवाजा तुटला असून घरात चोरी झाल्याचे त्यांना लहान भावाकडून समजले. माहिती मिळाल्यामुळे मोतीलाल सोनवणे हे लागलीच मोहाडी येथे गेले असता चोरीचा प्रकार झाल्याचे त्यांना दिसून आले. घरातील सामान अस्ताव्यस्त झाल्याचे त्यांना दिसले. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment