जळगाव जिल्हयातून तिघे जण हद्दपार

On: December 7, 2022 8:21 PM

जळगाव : पाचोरा पोलिस स्टेशन हद्दीतील तिघा गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. सलमान बल्लु पिंजारी, शाहरुख शेख लाल शेख, आणि शेख फिरोज शेख नजीर पिंजारी (सर्व रा. कुर्बान नगर, पाचोरा) अशी तिघा गुन्हेगारांची नावे आहेत.

टोळीने गुन्हे करणा-या इसमांविरुद्ध मुंबई पोलिस कायदा कलम 55 नुसार हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधिक्षकांकडे आल्यानंतर पुढील कारवाईअंती या तिघा गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहेत. या तिघांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला टोळीने गुन्हेगारी कारवाया केल्याप्रकरणी विविध गुन्हे दाखल आहेत.

टोळीने राहून पाचोरा शहर व परिसरात दहशत पसरवण्याचे काम या तिघांनी सुरुच ठेवल्यामुळे नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाया करुन देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नसल्यामुळे त्यांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment