खूनाचा राग मनात धरुन शिवीगाळ

On: December 12, 2022 10:44 AM

जळगाव : खूनाचा राग मनात धरुन तरुणाला शिवीगाळ व दगड फेकून मारल्याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पियुष उर्फ वाघ्या मुकुंदा ठाकुर रा. तुकाराम वाडी जळगाव, कुणाल उर्फ दुंड्या कोळी रा. कुसुंबा ता. जळगाव, रोहित उर्फ भाल्या उत्तम भालेराव रा. तुकारामवाडी जळगाव, स्वप्निल उर्फ गोलू धर्मराज ठाकुर रा. काशिबाई शाळेच्या मागे ज्ञानदेव नगर जळगाव अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघा तरुणांची नावे आहेत.

आकाश सुकलाल ठाकुर हा तुकारामवाडीतील रहिवासी तरुण त्याच्या मित्रांसह 11 डिसेंबरच्या सायंकाळी उभा होता. त्यावेळी सुरज ओतारी याच्या खुनाचा राग मनात धरुन चौघांनी मिळून आकाश व त्याच्यासोबत असलेल्या मित्रांना अश्लिल शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर आकाश व त्याचे मित्र निघून जात असतांना त्यांच्या दिशेने दगड फेकून मारले. या घटनेप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. रामकृष्ण पाटील करत आहेत. अद्याप कुणाला अटक नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment