दोघा मोटार सायकल चोरट्यांना अटक

On: December 13, 2022 5:45 PM

जळगाव : मोटार सायकलची चोरी करुन ती वापरत असलेल्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. विजय उत्तम सुतार व चंचल ओमप्रकाश सालवी अशी अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत.

जळगाव शहरातील गोलाणी मार्केटच्या पार्कींग परिसरातून मोटार सायकल चोरी झाल्याचा गुन्हा जळगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल होता. त्या गुन्ह्यातील चोरीची मोटार सायकल विजय सुतार आणि चंचल सालवी हे दोघे वापरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांचा शोध घेण्याकामी एक पथक रवाना करण्यात आले होते.

पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील हे.कॉ. दिपक शांताराम पाटील, लक्ष्मण अरुण पाटील, पोना किशोर ममराज राठोड, रणजित अशोक जाधव, श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, ईश्वर पंडीत पाटील, चापोकॉ मुरलीधर सखाराम बारी व पो.ना. अशोक पाटील आदींच्या पथकाने दोघा चोरट्यांना शहरातील पांडे चौकातून ताब्यात घेत अटक केली आहे. चोरीच्या मोटारसायकलची नंबर प्लेट तोडून दोघे वापरत होते. त्यांच्या ताब्यातून ती मोटार सायकल हस्तगत करण्यात आली असून त्यांना पुढील तपासकामी शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment