प्राणघातक हत्यारासह रेकॉर्डवरील आरोपीस अटक

On: December 15, 2022 5:04 AM

जळगाव : पोलिसांच्या अभिलेख्यावरील आरोपीस प्राणघातक हत्यारासह एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. गुरुजीतसिंग सुजानसिंग बावरी असे तांबापुरा परिसरातील शिरसोली नाका येथील रहिवासी आरोपीचे नाव आहे. त्याच्या त्याब्यातून एक लोखंडी सुरा हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार गुरुजितसिंग बावरी हा आपल्या कब्जात लोखंडी सुरा बाळगत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकातील सहायक फौजदार आनंदसिंग धर्मा पाटील, पोहेकॉ अल्ताफ पठाण, पोना गणेश शिरसाळे, पोना सचिन पाटील, पोना विकास सातदिवे, पोना किशोर पाटील, पोकॉ छगन तायडे, पोकॉ मुकेश पाटील, पोकॉ राहुल रगडे, पोकॉ विशाल कोळी आदींना पो.नि. जयपाल हिरे यांनी तपास व कारवाईकामी रवाना केले.

धारदार हत्यारासह गुरुजीतसिंग बावरी यास तांबापुरा परिसरातून ताब्यात घेत त्याच्याकडील सुरा हस्तगत करण्यात आला. पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागिय पोलीस अधिकारी संदीप गावित आदींच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment