लाखो रुपयांच्या सिगारेट पाकीटांची चोरी

On: December 16, 2022 12:04 PM

जळगाव : पाचोरा शहरात भिंत फोडून लाखो रुपयांच्या सिगारेट पाकीटांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा शहरात बस स्टॅंड रस्त्यावर श्रीकृष्ण पान मसाला दुकान आहे. 14 डिसेंबर रोजी सायंकाळी ते 15 डिसेंबरची सकाळ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी या दुकानाची भिंत फोडून आतील 1 लाख 61 हजार 526 रुपये किमतीची सिगारेट पाकिटांची चोरी केल्याचे उघड झाले. सुनिल अशोक पंजाबी यांनी या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केला आहे. सहायक फौजदार प्रकाश संतोष पाटील पुढील तपास करत  आहेत.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment