रेती चोरीच्या टीप पोलिसांना का  देतो? – तरुणास नऊ जणांची मारहाण

On: December 17, 2022 11:53 AM

जळगाव : रेती चोरीच्या टीप पोलिस आणि महसुल विभागाला का देतो? अशी विचारणा करत तरुणास लोखंडी रॉडने मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनलाला नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाटीलगढी चोपडा येथील तरुण कुणाल प्रदिप पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार दिगंबर रविंद्र सोनवणे रा. भोकर-जळगाव, सागर रविंद्र सोनवणे भोकर-जळगाव, ललित मनोहर कोळी रा. वडगाव सिम ता. चोपडा, संदीप सज्जन कोळी रा. वडगावसिम ता.चोपडा, इश्वर सुरेश सपकाळे रा. गोरगावले ता. चोपडा, विनय जितेंद्र सरदार रा. गोरगावले ता. चोपडा, तुषार दिनकर सपकाळे रा. गोरगावले ता. चोपडा, सचिन सुधाकर देवराज गोरगावले-चोपडा आणि  चेतन राजेंद्र बाविस्कर गोरगावले-चोपडा अशा  नऊ  जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक घनशाम तांबे करत  आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment