बाळंतपणासाठी आलेल्या विवाहितेचे रकमेसह दागिने चोरी

On: December 20, 2022 8:17 PM

जळगाव : बाळंतपणापासाठी विवाहितेने सोबत आणलेली रक्कम आणी दगिने चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. साडेसात हजार रुपये रोख, सोन्या चांदीचे दागिने असा एकुण 68 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे.   

मज्जिदशाह हसनशाह फकीर हे तांबापुरा परिसरातील रहिवासी भंगारची गाडी चालवून उदरनिर्वाह करतात. त्यांची विवाहीत मुलगी अमळनेर येथून 2 डिसेंबर रोजी बाळंतपणासाठी जळगाव येथे माहेरी आली होती. येतांना तिने सोबत रोख रक्कम आणि दागिने आणले होते.

14 डिसेंबर रोजी मज्जीदशाह यांच्यासह घरातील सर्व सदस्य मुंबई येथे गेले होते. जातांना त्यांनी घराला कुलूप लावले होते. 19 डिसेंबर रोजी सर्वजण परत आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment