पतीचे अनैतीक संबंध समजले पत्नीला – पतीसह प्रेयसीची विवाहितेला जीवे मारण्याची धमकी

On: December 21, 2022 10:50 AM

जळगाव : पतीचे अनैतिक संबंध समजलेल्या विवाहीतेस तिच्या पतीसह प्रेयसीने अश्लिल शिवीगाळ व जीवे ठार करण्याची धमकी दिल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील इंद्रप्रस्थ नगरात राहणा-या विवाहितेचा पती कसारा येथे आरपीएफ कार्यालयात नोकरीला आहे. पिंप्री चिंचवड आरपीएफ कार्यालयात काम करणा-या तरुणीसोबत त्याचे अनैतिक संबंध जुळून आल्याचे म्हटले जात आहे.

आपल्या पतीचे अनैतिक संबंध असल्याची माहिती जळगावच्या इंद्रप्रस्थ नगरातील विवाहितेला समजली. प्रेयसीने तिच्या विवाहीत प्रियकराच्या पत्नीला कॉल करुन सांगितले की तुझी मुलगी ज्या ऑटो रिक्षाने शाळेत जाते त्या शाळेचे नाव मला माहिती असून ती शाळेतून परत येणार नाही. अशा प्रकारची धमकी वारंवार मिळाल्याने ती विवाहीता धास्तावली. याशिवाय अतिशय अश्लिल शिवीगाळ तिला तिच्या पतीच्या प्रेयसीकडून वेळोवेळी मिळाली.

विषय एवढ्यावरच थांबला नाही तर विवाहीतेच्या पतीने देखील तिला व्हाटसअ‍ॅपच्या माध्यमातून धमकी देण्यास सुरुवात केली. तु माझी आणि माझ्या प्रेयसीची वारंवार पोलिसात तक्रार कशी  करते? तु कितीही तक्रारी कर आमचे काहीच होत नाही. मी तुझे आणि मुलांचे लहान लहान तुकडे करणार आहे. थोडे दिवस थांब, तुला रस्त्यातूनच हटवावे लागेल. तु माझ्या रस्त्यातील काटा आहे. पतीसह त्याच्या प्रेयसीकडून मिळणा-या  धमक्यांमुळे विवाहीतेन जळगाव शहर पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध रितसर फिर्याद दाखल केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलिस नाईक स्वप्नाली सोनवणे करत  आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment