मोबाईलची जबरी चोरी करणा-या दोघा चोरट्यांना अटक

On: December 22, 2022 12:57 PM

जळगाव : एमपीएससीची तयारी करण्यासाठी मुंबई येथून जळगावला आलेल्या तरुणीचा मोबाईल हिसकावून मोटार सायकलने पळ काढणा-या तिघांपैकी दोघा चोरट्यांना एलसीबी पथकाने शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. या  प्रकरणी रामानंद नगर  पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अटकेतील दोघांना रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले  आहे.

विशाल दिनकर सपकाळे शास्त्रीनगर जामनेर आणि आकाश कडु आल्हाट रा. शिवाजीनगर जामनेर अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. त्यांचा तिसरा साथीदार योगेश सोनार रा.  जामनेर हा फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. योगेश सोनार याच्या मदतीने दोघांनी हा मोबाईल चोरीचा गुन्हा केल्याचे दोघांनी कबुल केले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोहेकॉ. सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख, संदीप साबळे, पोना विजय पाटील, पोना अविनाश देवरे, पोना नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, पोकॉ. सचिन महाजन, पोना किरण धनगर आदींच्या पथकाने या  गुन्ह्याच्या तपासकामी परिश्रम घेतले.

नवी  मुंबई येथील तरुणी आपल्या मैत्रीणीसह एमपीएससीच्या क्लाससाठी जळगाव येथे रहात होती. ती  आपल्या मैत्रीणीसह मोबाईलवर बोलत पायी चालत असतांना तिघा चोरट्यांनी भरधाव मोटार सायकलवर येत  मोबाईल हिसकावून पलायन केले होते. त्यात तरुणी खाली पडून जखमी झाली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment